आज अचानक’ ट्रेक ला जाऊ’ असं डोक्यात आलं आणि डोंगरवाटा
तुडवलेली आणि निसर्गाने वेड लावलेली चार डोकी पुन्हा नव्याने ट्रेकला निघाली.ठिकाण
ठरलं,वेळ ठरली, भेटण्याची जागा सुद्धा ठरली.१.३० वाजता स्वारगेट बस stand!मी मात्र
मनाने कधीच राजगडावर पोचले होते.राजगड या एका शब्दानेच जादू केली होती.मन राजगडाभोवती
पिंगा घालू लागलं होतं.पद्मावती,सुवेळा संजीवनी माची, डौलात उभा असलेला बालेकिल्ला
अगदी सगळं डोळ्यासमोर होतं.अर्जुनाला दिसलेल्या पक्षाच्या डोळ्याप्रमाणे मला फक्त
राजगड दिसत होता.पद्मावतीच्या देवळात sack ठेऊन मी केव्हाच निवांत फिरायला लागले
होते.तिथपर्यंत जाणारी पायवाट खाचखळगे सगळं कसं लख्खं! STच्या आवाजाने तंद्री
तुटली आणि नसरापूर फाट्याला पोचलो हे लक्षात आlaM नवीन सोबती,नवीन
लोकं नव्यानेच भेटलेली पण जुनी ओळख असल्यासारखी सोबत. STमहामंडळाला अनंत आशीर्वाद
देऊन आम्ही पुढच्या प्रवसाला लागलो.रिक्षावाल्याला अनेक विनवण्या करून शेवटी
एकदाची आमची वरात पायथ्याशी पोचली.आता मात्र पायवाट खुणवायला लागली.सूर्य अजून
डोक्यावर होता,मधेच वाऱ्याच्या २-४ चुकार सुखद झुळुका.पायवाट कसली राजरस्ताच
म्हणावा अशी ती वाट.छोटासा चढ पार करुन आम्ही पठारावर पोचलो.समोर
राजगड..देखणा!आपल्याच तंद्रीत रमल्यासारखा.ध्यानाला बसल्यासारखा किंवा क्षणात
स्थितप्रज्ञ वाटणारा.डाव्या हाताला सुवेळा माची तर समोर पद्मावती.जणू काही हात
पसरवून आमचं स्वागत करतो आहे.पठारावरून पुन्हा वळणं घेत वाट पुन्हा चढावर
आली.सूर्य अस्ताला आलेला, आसमंतात लाल केशरी जर पसरली होती.हळूहळू दिशा गडद होत
चालल्या होत्या.चोर दरवाजातून आम्ही सुद्धा चोरपावलांनी किल्ल्यावर प्रवेश
केला.शांत वारा, निवांत वातावरण कसलीतरी ओढ लावणारं.कसलीही धावपळ नाही, घाई नाही
सगळं कसं मस्त आपल्याच नादात.एका लयीत चालणारं.वाऱ्याचा ताल धरुन हळुवार डुलणारी
झाडं.संथ लयीत वारा पद्मावती तळ्यात हळुवार तरंग उठवत आपलं अस्तित्व जाणवू देत
होता.
पद्मावती माचीवर देवळात आम्ही मुक्काम ठोकला.समोर पद्मावती
तलाव.हत्तींच्या विहाराची हि जागा,शेकडो कमळ इथे नांदली असतील.मागेच
बालेकिल्ला.कधीतरी सईबाईंनी तिथूनच हि डुलणारी कमळ बघितली असतील.मनात सहज विचार
उमटून गेला.मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी.कदाचित त्यांच्या लाडक्या तलावासमोर
मुद्दाम बांधली असावी अशी.बालेकील्ल्यापासून चोरदरवाजा पर्यंत भुयारी मार्ग जो आता
काळाच्या ओघात लुप्त झाला आहे.बालेकिल्ला आणि मंदिर यां मध्ये सदर.इथेच नवीन
मोहिमा आकारल्या असतील.अनेक खलबतं गनिमी कावे इथेच ठरले असतील.पद्मावती च्या देवळा
समोर दारूगोळ्याचं कोठार पुढेच पागा..स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर आम्ही असे
थकले भागले मावळे!काही जाणते..काही अजाणते!विचारांच्या तंद्रीत पोटातल्या
कावळ्याचं भजन ऐकूच नाही आlaM मंदिराजवळ सध्या राहत असलेल्या एका म्हाताऱ्या
जोडप्याकडून आमच्या पिठलं भाकरीची सोय झाली.जेवणावर येथेच्छ ताव मारून आम्ही
पुन्हा निवांत झालो.गप्पा गोष्टींमध्ये वेळ छान गेला.हळू हळू सगळे पांगले.मी मात्र
विचार करत होते.किती बरं दिवस झाले इथे येऊन?दिवस?महिने?कि वर्ष?खूप दिवसांनी
एखादी जुनी खूप जवळची व्यक्ती भेटावी आणि तरीसुद्धा नात्यातला ओलावा तसाच टिकून
असवा असंच काहीसं झालं होतं माझं.४ वर्षांनतर मी राजगडावर आले होते.तरीही
एकमेकांची ओळख कायम होती असं वाटत होतं.रात्र झाली तसं आकाश चांदण्यांनी भरून
गेलं.गडावर आम्ही ४ डोकी सोडली तर दुसरं कुणीही नव्हतं.पायथ्याच्या एका गावातून
कोणा एका बाईचं?प्रवचन रंगात आlaM होतं.आमच्यातले काही मावळे दमून नंतर झोपायला
गेले.मला मात्र जगायचं होतं.न जाणो राजगडावर पुन्हा कधी येणं होईल?शांत निवांत
रात्र मंद वारा.थंडी सुधा हवीहवीशी वाटणारी.थोड्याच वेळात चंद्रोदय झाला.अवर्णनीय
असं होतं वातावरण.शब्दात मांडता न येण्यासारखं!आम्ही पहाट होईपर्यंत फिरत होतो.एक
एक दिवा बंद व्हावा तशा चांदण्या गायब झाल्या.आकाशात नुकतीच आवराआवर सुरु
झालेली,पूर्वेला लाल केशरी रंगांची गर्दी झाली होती.कॅमरामध्ये ते क्षण बंदिस्त
करुन घेतले.नवा दिवस नवी पहाट पुन्हा एकदा सह्याद्रीने नव्याने प्रेमात पाडलं!निखळ
निरागस अनुभव..पुन्हा नव्याने!
परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.पायथ्यापाशी पोचलो.सरबत
चहा असे सगळे सोपस्कार होऊन आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो.काही काळ एकत्र
आलेल्या वाटा आता वेगळ्या झाल्या.आधीच्या माझ्या शिदोरीत आणखी हि थोडी निवडक भर..कधीही
विसरता न येण्यासारखी!!
वाह, निव्वळ अप्रतिम....
ReplyDeletekhupach sundar
ReplyDelete