Saturday, August 18, 2018

Pawsome...


गोल्डी बाईंची लगबग सुरु होतीं. पोरांसाठी योग्य जागा शोधण्याची मोहीम चालू होती. गोल्डी आमची Ginger जातीची मांजर. नावाप्रमाणे सोनेरी. गोल्डी अतिशय हुशार, तिला माणसांची भाषा अवगत झाल्यासारखी. इतकी मोठी होऊनही पिल्लांसारखी खेळायची. आता ती आई होणार कळल्यावर
एकदम शांत शहाणी झालेली. तिच्या पिल्लांसाठी आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. एक मोठा खोका त्यात मऊसर चादर उशाला कापूस, जय्यत तयारी!
शेवटी एक दिवस ऑफिस हुन पोचले तोपर्यंत बाईनी एका पिलाला जन्म दिला होता. पांढरं सोनेरी गोड पिल्लू. आता अजून दोन झाली, आकाराने पाहिलं मोठा, दुसरं  जाड तिसरं अगदीच बारीक. गोल्डी आणि पिल्लं टुमटुमीत झाल्यावर तिने तिचा मुक्काम माझा घरी हलवला. माहेरवाशीण गोल्डी कधी गादीवर झोपा काढायची कधी पोरांबरोबर मस्ती करायची.पिल्लं आता डोळे उघडून नवलाईने सगळं बघायला लागलेली. मोठा बोका आणि धाकट्या जुळ्या बहिणी. त्यांचं बारसं करायची वेळ आली. पिल्लांचा जन्म बजाज च्या खोक्यात झाला त्यावरून बोक्याचं नाव मी बजाज ठेवलं तर धाकट्या दोघी बबली आणि डबली.
बजाज चं नंतर बज्जु झालं . बज्जु खूपच समजूतदार, दादासारखं  वागायचा. खायला दिलं की प्रथम बहिणी खाणार मग उरलं सुरलं आमचे बज्जु महाराज खाणार. मधली बबली अतिशय जाड आणि सगळ्यात बंडखोर तिला सांभाळणं गोल्डी ला महाकठीण जात असे. बज्जु तिला पकडून शांत करत  असे. बहिणी झोपल्या कि बज्जु चाटून चाटून त्याना थोपटत असे. बज्जु ने लहानपणापासून बहिणींचे खप लाड केले, धाकटी डबली कोणाही जवळ जात नसे. मात्र बज्जु आला कि त्यांचे लाड चालत. खूप लहानपणा पासून बज्जु मस्ती न करता ऊन खात बसे बहिणी मस्ती करताना बघत तर कधी वटारु सोबत फिरून येत. खूप गुणी. तो पिल्लू असल्यापासून त्याला माझ्या मांडीत येऊन झोपायची सवय. तो सारखा माझा सोबत असे. मी ऑफिस हुन यायची वेळ झाली कि साहेब कट्ट्यावर वाट बघत बसलेले दिसत कधी वेळ चुकली नाही. आमचा इथे तेव्हा जॉन होता. जॉन आमचा कुत्रा. अतिशय प्रेमळ आणि चपळ, कुत्र्यांमध्ये handsomest . जॉन आणि बज्जु चांगले दोस्त झालेले.  जॉन ने बज्जु ला कधीच त्रास दिला नाही, वटारु  च्या मात्र तो कायम विरोधात असे, बज्जु होताच तसा कि कोणी त्याला त्रास देणं शक्य नाही. बज्जु ने कधी मारामाऱ्या केल्या नाही. त्याचा हट्ट फक्त माझ्याकडे  असे. सगळ्यांना लाड केले खाऊ दिला कि सगळी मंडळी खुश. बज्जु  आणि वटारु रोज माझ्या पांघरुणात झोपत. दुसरं कुणी आलं  तरी त्यांना काळात असे आणि मग ते उठून बरोबर माझा इथे येत असत. जसा बज्जु मोठा झाला, तास तो त्याच्या बहिणींच्या पिल्लाना सांभाळत असे.मामा कडे पोरं खुशीत राहत. बज्जु आणि वटु ने कधीच कोणतंच पिल्लू मारलं नाही. बज्जु आणि वटु मध्ये एका वेगळ्याच लेव्हल चं understanding होतं . दोघे तरणे बोके कधी भांडले नाहीत. सोबत असायचे आनंदानं.  बज्जुच्या अनुपस्थितीत इतर बोक्यांपासून पिल्लं सांभाळायची जवाबदारी वटारू स्वतःहून घ्यायचा. दोघे एकत्र शिकार करून खात, मस्तं  चाललं  होतं  आमचं. वटारू  ५ आणि बज्जु साडे ४ वर्षांचा. एक दिवस वटारू निघून गेला ते थेट ९ महिन्यांनी परत आला, हाडांचा पार सापळा झाला होता. बज्जुने धावत जाऊन त्याला चाटलं .प्राण्यांमध्ये खरोखर निस्वार्थी प्रेम असतं. बज्जु वटारू  जॉन ह्यांनी मला खूप दिलं. कसलीही अपेक्षा ना करता प्रेम केलं , करायला शिकवलं .
मी एकटीच राहायचे पण यांच्यामुळे कधी एकटेपण नाही जाणवलं. माझे मित्र बनले सगळे, मी बोलायचे त्यांच्याशी. कधी माझं मन ओळखून मी दुखी आहे असं कळलं कि जवळ येऊन चाटायचे हाताला. जाणीव करून द्यायचे कि मी एकटी नाही. आणि हि परिस्थिती सुद्धा निघून जाईल. त्यांनी मला खूप साथ दिली.
माझ्या चांगल्या वाईट क्षणांचे ते खरे साथीदार होते, माझ्या मनात त्यांचासोबतचे सगळे क्षण कायमचे कोरले गेलेत. ह्यांच्यामुळे प्राणी विश्वातली वेगळी गणितं  मला उमजली. कधी माणसांसोबत उमजतील का सांगता येत नाही. मानव इतका निस्वार्थी नाहीच.
माझ्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचे सुद्धा ते ओळखीचे झालेले. मी खूप जपलं  सगळ्या प्राणी दोस्ताना. त्यांचं  औषध पाणी त्यांची पिल्लं सगळंच, वेगळंच  विश्व आहे ते एक. तुम्ही त्यांना विश्वास दिलात कि सहज सामील करून घेतात ते तुम्हाला त्यांच्या जगात.
मी लग्नं  होऊन दुसऱ्या घरी आले. इतकी कधी रडले नसेन जितकी त्यांना सोडून येताना  रडले, वारंवार समोरच्या काकूंना त्यांची काळजी घ्यायला सांगायचे.
ते परावलंबी नव्हते तरीही,
त्यांनाही ती जाणीव झाली, माझी भाषा कळली का कुणास ठाऊक पण दोघेही मला बिलगून बसले मी निघायच्या आधी. लग्न आधी आठवडा भर वटारु ने खूप मोठ्या अपघातातून स्वतःला वाचवत माझा पर्यंत आणलं . आपल्या शेवटच्या घटका  माझा सोबत घालवाव्या  असं किंवा आपल्यला  मदत इथेच मिळेल हा विश्वास असेल, पण तो आला. त्याचे सगळे सोपस्कार मी केले, surgery  साठी दुसरीकडे नेऊन ठेवले. त्यातून तो वाचला. पण काही दिवसांपूर्वी त्याला स्वतःचा बचाव ना करता आल्याने त्याचा मृत्यू झाला .  वटारु  माझा त्या घरातला पहिला मित्र. मरेपर्यंत त्याने मला खूप साथ दिली. तो हे जग सोडून गेला  ह्यावर माझा अजून मन विश्वास ठेवत नाही. बज्जु ला भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून मारलं . त्याला मदत मिळू शकली  नाही तो हे जग सोडून अनंतात विलीन झाला, मी माझे २ बेस्ट फ्रेंड्स गमावले. एकामागे एक. पण मला खात्री आहे. तुम्ही जिथे कुठे असाल माझ्या लाडक्या मित्रांनो तिथे तुम्ही खप सुखात राहा. बज्जु आणि वटु कायमच माझे छोटेसे मित्र राहतील. . माझ्या ह्या जिवलग मित्रांमुळे मला प्राणी विश्वातील खूप जणांसाठी मैत्रीची कवाडं उघडून दिली आहेत त्यासाठी कायम मी ह्या सगळ्या दोस्तांची ऋणी राहीन.

Description: Image result for paw quotes

4 comments:

  1. apratim
    .bajju wataru john ...tithlya kunalach visarane shakya nahi..tuzya lekhanamule tyana parat bhetlyasarkhe vatle.

    ReplyDelete
  2. Khoop chhan...tu tuzya extended family var kharach khoop manapasun prem keles...I have seen it.

    ReplyDelete
  3. खुप छान लिहिले आहेस तुझे अनुभव.....

    ReplyDelete