माझा रारंगढांग
गोठवणारी थंडी पडली होती. वेळ पहाटे ४-४. ३०ची. बाहेर पडून बघितलं तर समोर बर्फ ल्यालेले डोंगर तिन्ही बाजूनी उभे. अजूनच उंच, समोर असूनही लांब. हाडं गोठवणारी थंडी!एक क्षण थांबून मी समोरच्या शिखराकडे पाहिलं. हि इतकी शांतता ही किती आवाज करत होती. मनात एक पोकळी निर्माण झाली. आपण या समोर कोण?कुठून आलो?कोण कुठले छोट्याश्या शहरातून आपल्या आशा आकांक्षा जपणारे, पोटासाठी काम करणारे, उदरभरणासाठी चमचमीत खाणारे, so called चांगली lifestyle असणारे!आज या रारंग ढांगासमोर पहाटेच्या चांदण्यात उभे आहोत. सोबतचे सगळे गाढ झोपलेले. मी एका दगडाला टेकले. मला पहिले आठवण झाली ती रारंगढांगची. असाच असेल नाही तो ही? भव्य, आपल्याला आपलं अस्तित्व सांगणारा, क्षुल्लक आहेस पण निरर्थक नाहीस ही जाणीव करून देणारा. कितीही उंची गाठली तरी अजूनही उंच असणारा, रारंगढांग!एक प्रकारचं पूर्णत्व आल्याचा भास करून देणारा.
नकळत माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. किती रे वाट बघितली तुला भेटण्याची?यावेळी ही जमेल असं वाटलं नव्हतं. आतूर होते मी तुला बघायला,भेटायला. लहानपणी बाबांच्या वर्णनातून, आईने दाखवलेल्या फोटो तुन, मित्रांच्या गप्पांतून एक प्रतिमा तयार झाली होती तुझी. खरा किती वेगळा आणि किती तसाच आहेस तू. किती थांबवलस भेटायला, आज समोर तू दिसतो आहेस, हे क्षण संपू नयेत असे आहेत. दगडाला टेकून बसलेली मी आणि समोर फक्त तू. बर्फ ल्यालेला,उंच, Tall dark handsome म्हणतात तसा...बाकी कुणीच आसपास नाही. तेही बरंच म्हणायचं .
तुला बरेच भेटले असतील नाही? बऱ्याच जणांना तू या नादाला लावलं असशीलही!असं पहाटे एकटंच कुणाला भेटलास कधी?भेटलाही असशील...
काल भेटलास तोही तूच ना? कलकत्ते वली पहाडी का काय ती?नाव रूप बदलून आलास, हिरवी मोठी झाडं घेऊन, तेव्हाही तितकाच आवडला होतास. आणि आज बर्फात खेळलो तेव्हा? धाक दाखवलास ? किती वर्ष गेली नाही भेटू भेटू म्हणण्यात??मला माझ्या लोकांबरोबर तुला भेटायचं होतं . वेळ लागला खरा!एक गणित होतं बघ डोक्यात.असाच दिसलास का तू सगळ्यांना?आवडलास मला एकदम!असाच राहा असाच राजस आणि असाच matured!
माझं बाकी बरं चाललंय तिथे, कधी तुला आठवेन मी..
आणि ती तुझी सोबतीण... ती पण फार आवडली मला... तिच्या सोबतच तर आलो आम्ही... इथेच सुरु होते तुझ्यात. किती एक आहेत तुम्ही...
तुला सांगू, मला ना भीती वाटायची तिची, पण आता ओळख झाली आमची छान!ठरवलंय मी तिच्यात एकदा तिचं होऊन बघायचं .. बघायचं आहे तू दिसतोस का\?मला खात्री आहे तुझा अंश असेलच तिच्यात. तिचं अस्तित्व काही वेगळं नाही रे! 'ती' म्हंटलं कि ओघाने आलंच 'त्याच्यत' होऊन जाणं ..नाही का?
छान वाटलं पण तुझ्याशी बोलून आता माझ्यातही आहेस तू. कधी आठवलास की बोलेन तुझ्याशी, आणि तिच्याशीही.
डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले ततेव्हा मी भानावर आले. सूर्याचे किरण त्याच्यावर पडत होते. किती साजरं हे रूप!बर्फ चमचम करत होता, सोनेरी!रारंगढांग ह्या क्षणी फक्त माझा होता. तो सोहळा किरणांचा, पहाडांचा आणि दगडाला टेकलेली मी...
पुढे ती परत भेटली.. भव्य पात्र, त्याच्यापासून लांब, शांतपणे पुढे जात होती.
कुणी गंगा म्हणतात, कुणी मैय्या, कुणी holly गंगा. माझ्यासाठी ती नुसती 'ती' आहे.. ठरल्याप्रमाणे मी तिच्यात झेप टाकली. हसली ती. ओळख होतीच आता.
निःशब्द झाले मीही, त्याचा अंश होताच तिच्यात, हिरव्या झाडांमधला, बर्फातला थोडा सगळाच! वर निरभ्र आकाश आणि मी तिच्यात तरंगत होते.अलगद हळुवार लाटांवर. ती पूर्ण त्याची होऊनही आपल्या प्रवासाला निघालेली. जेव्हा मी किनाऱ्यावर आले, त्याने माझ्याकडे पाहिलं .थोडं काळजीने अन हसून. त्याला कळलं असेलका माझं तिच्यातून येणं आणि बदलणं, मला माझी दिशा मिळाली, तिचं त्याची होऊन प्रवासाला निघण्याची!